बेळगावच्या एम एल आय आर सी अर्थात मराठा इन्फन्ट्रीचे जवान सध्या चिकोडी येथील पुरग्रस्थ भागात मदतीच्या कामात लागलेले आहेत. देशासाठी प्रशिक्षित आणि सक्षम जवान तयार करण्याचे काम करणाऱ्या या इंफंट्रीने आपत्कालीन स्थितीत स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला मदत केली आहे. आताही हे जवान बोटीच्या साहाय्याने मदतकार्य करत आहेत. यामुळेच मराठा इन्फन्ट्री हर काम मे आगे!
2 ऑगस्ट रोजी मराठाला मदत करण्याची विनंती करण्यात आली होती. पुराने उत्तर कर्नाटक प्रांतात निर्माण झालेल्या पुरग्रस्थ स्थितीत रेजिमेंट ने लवकरात लवकर मदत काम सुरू केले..पाच अधिकारी,सहा कनिष्ठ अधिकारी आणि दीडशे जवान मदतकार्यात गुंतले आहेत.
रेजिमेंट चे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कालवड यांनी या टीमला बचाव कार्य करण्याच्या वेगवेगळ्या तंत्रांची माहिती दिली. महाराष्ट्राने कृष्णा नदीचे वाढीव पाणी सोडल्याने चिकोडी तालुक्यातील 37 गावे पाण्याखाली गेली.2 लाख 40 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याने कर्नाटक मधील नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामध्ये मराठा ने नेमलेले अधिकारी, अभियंते आणि जवान आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.
दहा बोटीच्या साहाय्याने सेनेचे जवान मदत कार्य करत आहेत.वैद्यकीय मदत केंद्र मिलिटरी हॉस्पिटलतर्फे उघडण्यात आले आहे.आहार वितरण केंद्र उघडून जनतेची सोय करण्यात आली आहे.मद्रास इंजिनियरिंग ग्रुपचा टास्क फोर्स देखील पूरग्रस्तांना मदत करत आहे. यामध्ये एक अधिकारी,दोन जेसीओ आणि 45 इतर रँकचे जवान सहभागीआहेत.गावांचा संपर्क तुटू नये आणि पर्यायी मार्ग तयार करण्याच्या कामात ते गुंतले आहेत.बोटी आणि इतर साहित्यासह ते मदत कार्यात गुंतले आहेत.