बेळगाव शहराच्या उत्तर भागात नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध खडक गल्लीच्या राजाचा चांदीच्या आभूषणांचा अभिषेक करण्यात आला आहे. खडक गल्लीच्या बाप्पाला अनेक भक्तांनी आपली मागणी पूर्ण होताच आभूषण अर्पण केले आहेत अश्या चांदीच्या श्री च्या आभूषणांचा अभिषेक शनिवारी खडक गल्ली येथील मरगाई मंदिरात करण्यात आला.
केवळ बेळगावच नव्हे तर पर राज्यातून देखील अनेक भाविक खडक गल्लीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी बेळगावला येत असतात दिवसेंदिवस या बाप्पाची ख्याती वाढतच आहे भेट आणि नवस पूर्ण होऊन दिलेल्या दागिन्यांचा अभिषेक करण्याचा निर्णय मंडळाने घेतला त्यानुसार शनिवारी हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला डॉ आनंद सोमनाचे डॉ उमेश आर्य रामा बाचुळकर,नितीन पेरनूरकर,राघवेंद्र काकडे,बाबू बेकडी,संदेश मुचंडी आदी भक्तांनी दागिने व महाप्रसाद देऊन सहकार्य केले आहे. यावेळी आमदार अनिल बेनके,ए सी पी एन व्ही भरमनी,पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी,धीरज शिंदे ,युवक पंच मंडळी महिला आदी उपस्थित होते.