बेळगाव जिल्ह्यातील 9 चोरी प्रकरणात गुंतलेल्या 4 जणांनाखडेबाजार उपविभाग पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडील 3 बाईक व सोन्याचे दागिने जप्त करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.11 मे 2019 रोजी देशपांडे चाळ येथील श्रीमती विमला सीताराम शिंदे या चित्रा टॉकीज बोळ येथून जात असताना बाईक वरून येऊन त्यांच्या गळ्यातील 32000 चा सोन्याचा हार पळविले होते.
2 ऑगस्ट रोजी याच प्रकरणातील चोरटे असावेत या संशयावरून खडेबाजार आणि उद्यमबाग पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असता त्यांनी खडेबाजार, उद्यमबाग, टिळकवाडी, माळमारुती, अंकलगी सह एकूण 9 ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडील एकूण 184 ग्रामचे सोन्याचे दागिने, 2 पलसर व 1 हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण8 लाख 98 हजार 800 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दीपक सुरेश अगसीमनी( 21),देवराज यल्लप्पा पुजारी( 21),नागराज चिदानंद तळवार( 20),अस्लम मौलासाब शेरेगार (20) सर्वजण ( लक्ष्मी नगर उद्यमबाग) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.