बेळगावात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीचा अंदाज घेऊन गेल्या गुरुवारपासून इस्कॉन च्या वतीने गरजूंना प्रसादाचे (जेवणाचे)वितरण केले जात आहे .इस्कॉन अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी साडेतीन हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.
त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा प्रसाद सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी दुपारी हुक्केरी, गोकाक या भागातील कार्यकर्त्यांनी एक हजार पाकिटे वितरणासाठी नेली तर शिवाजी कॉलनीमध्ये 500, काँग्रेस रोड परिसरात 50, सराफ कॉलनीतील शिवसागर अपार्टमेंट परिसरात 50 अशी पाकिटे सकाळी बारा वाजेपर्यंत देण्यात आली.खानापूर तालुक्यात देखील सायंकाळी प्रसाद पाकीट देण्यात आली आहेत.
‘जोपर्यंत लोकांना त्याची गरज आहे तोपर्यंत आम्ही हा प्रसाद बनवून सातत्याने देणार आहोत त्यासाठी अनेक समाजसेवी संघटनाही पुढे आल्या असून अनेकांनी पाकिटे भरण्यासाठी सहकार्य केले आहे ‘अशी माहिती इस्कॉन चे अध्यक्ष भक्ती रसामृत महाराजांनी दिली.