मुसळधार पावसाने सगळी जनता हवालदिल झाली असली तरी खवय्ये मात्र पावसावर खूष आहेत त्यातही मत्स्यप्रेमी अधिक खूष आहेत.जोरदार पावसामुळे अनेक गावातील अनेक तळ्यातील मासे पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडत असल्यामुळे आपसूकच ते मासे पकडणाऱ्याना सापडत आहेत.
येळ्ळूर येथील अरवाळी धरण तुडुंब होऊन ओव्हरफ्लो झाले आहे गेल्या आठवडाभरात यातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्या पाण्यातून मासे देखील बाहेर पडत आहेत.हे मासे आकाराने मोठे आहेत.तलावात मासे मिळतात हे कळल्यावर अनेकांनी तेथे मासे पकडण्यासाठी गर्दी केली आहे.पाच सहा दहा किलो वजनाचे मासे देखील काही भाग्यवानांना मिळत आहेत. काही जण गळ टाकत आहेत तर काहींना पाण्याच्या प्रवाहा बरोबर बाहेर आलेले मासे मिळत आहेत
मासे पकडणाऱ्यापैकी काही जण मासे घरी घेऊन जाऊन खात आहेत तर काही जण मासे विकून पैसे कमवत आहेत.एकूणच हा पावसाळा काही जणांच्या पथ्यावर पडला आहे. येळ्ळूर धरणात अनेक युवक मासे पकडण्यासाठी गर्दी करत आहेत मंगळवारी एकाच दिवसांत अंदाजे दीड टन मासे मिळाले असल्याची माहिती आहे.