पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला मात्र गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला दूध सागर धबधबा 5 सप्टेंबर पासून रेल्वे विभागाकडून खुला करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
स्थानिक मराठी दैनिकाने ही बातमी केली असून रेल्वे खाते रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या सूचनेनुसार पाच सप्टेंबर पासून दुध सागर धबधबा खुला करेल अशी शक्यता आहे.
या धबधब्याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक जात होते. मात्र तेथे अनेक घटना घडल्या. त्या घटना पाहता रेल्वे विभागाने धबधबा पाहणे बंद केले होते. रेल्वेतून ये-जा करताना हा धबधबा पाहता येत होता पण त्या ठिकाणी उतरता येत नव्हते. पण पाच सप्टेंबर पासून दूध सागर या ठिकाणी उतरून पर्यटकांना याचा लाभ घेता येईल अशी व्यवस्था होण्याची चिन्हे आहेत