गेली चार वर्षे बेळगाव शहर पोलिसांच्या ताफ्यात स्फोटक वस्तू शोधण्याचे काम करणाऱ्या नयना या श्वानाचा आजाराने मृत्यू झाल्या नंतर पोलिसानी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केला.पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी सॅल्युट देत नयनाला अंतिम विदाई दिली.
नयना गेली आठ वर्षे बेळगाव पोलिसांच्या स्कॉड मध्ये पोलीस मित्र म्हणून काम करत होती गेल्या चार वर्षा पासून स्फोटक वस्तू शोधण्यात तिची महत्वाची भूमिका होती. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ राजप्पा यांच्या कार्यकाळात वय झाल्याच्या कारणाने नयना ला निवृत्ती देण्यात आली होती.
नऊ वर्षे सेवा बजावल्या नंतर नयना ला विश्रांती मिळावी यासाठी डी सी राजप्पा यांनी तिला निवृत्त केले होते त्या नंतर डॉग स्कॉड मध्ये नयना चा समावेश नव्हता.राजप्पा यांनी स्व खर्चानी पोलीस आयुक्त आवारात विश्रांती उपचाराची सोय केली होती.राजप्पा यांची बंगळुरू ला बदली होऊन जाण्यापूर्वी नयना चो सोय स्वता करा दुसरी कडे करू नका अशी विनंती त्यांनी पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांच्या कडे केली होती त्यानुसार लोकेशकुमार यांनी या श्वानाची देखभाल करत होते. शनिवारी या श्वानचे निधन झाले शासकीय इतमामात त्यावर अंतिम संस्कार झाले