सिव्हिल हॉस्पिटलच्या तात्काळ चिक्कीचा विभागांमध्ये जास्तीत जास्त रुग्ण येत असताना त्याठिकाणी व्यवस्था पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेले नाही. या प्रकाराने सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे संतापले .त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत सिव्हिल हॉस्पिटलच्या विभागात काल रात्री धरणे आंदोलन छेडले होते. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते .
हॉस्पिटल प्रशासनाने जास्तीजास्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था याठिकाणी करावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मदन बामणे, सुनील मुरकुटे, प्रतिक गुरव व इतर अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. बेळगाव रेल्वे स्थानक परिसरात निपचित पडलेल्या एका वृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही.
यावेळी शांताई वृद्धाश्रमाची रुग्णवाहिका घेऊन विजय मोरे, मदन बामणे व इतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि रुग्णांची मोठी संख्या दाखल होत असताना रुग्णांची व्यवस्था पाहण्यासाठी कर्मचारीवर्ग नव्हता .यामुळे विजय मोरे संतापले होते. अखेर वाढीव कर्मचारी देऊन रुग्णांची सोय केली जाईल असे आश्वासन हॉस्पिटल प्रशासनाने दिल्यानंतर रात्री उशिरा हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या कारभारावर आम्ही लक्ष ठेवून असून आणखी गैरकारभार लक्षात आलाच तर उपोषण आंदोलन छेडू असा इशारा विजय मोरे यांनी दिला आहे.