Tuesday, December 31, 2024

/

काकती नदीकाठावर सापडला मृतदेह

 belgaum

काकती जवळील मार्कंडेय नदी काठावर एका ग्रॅनाइट कारखान्यात काम करणाऱ्या मॅनेजरचा मृतदेह सापडला आहे. अरुण हळीमनी वय 52 वर्षे रा. मारुती नगर काकती असे त्याचे नाव आहे.

घटनास्थळी काकती पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे बुधवारी सकाळी हा मृतदेह आढळला आहे.काकती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण हा होनगा इंडस्ट्रीयल भागात एका खाजगी कंपनीत कामाला होता पाऊस असल्याने गेले दिवस तो कामाला गेला नव्हता मंगळवारी सायंकाळी तो घरा बाहेर पडला होता बुधवारी सकाळी मार्कंडेय नदी काठावर त्याचा मृतदेह सापडला.

अरुणचे कुणाशी वैर नव्हते त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला असावा अशी शक्यता त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे मात्र पोलिस ही आत्महत्या आहे की खून याचा तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.