बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकात आलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय पथक आले आहे. सकाळपासून विविध भागात जाऊन त्यांचा दौरा सुरू आहे.
या पथकात भारत सरकारच्या केंद्रीय गृह खात्याचे संयुक्त सचिव प्रकाश, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाचे संचालक एस सी मीना, कृषी व शेतकरी मंत्रालय हैद्राबाद चे संयुक्त संचालक डॉ पुंनुस्वामी, जलसंधारण मंत्रालयाचे सुपेरिटेंडन्ट इंजिनिअर जितेंद्र पनवर, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे विजय कुमार, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे उप सचिव माणिक चंद्र पंडित, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे उप सचिव पी सुमन हे आहेत.
सकाळी सर्किट हाऊस येथे बैठक व आढावा घेऊन ते पाहणी करत आहेत. कर्नाटकाने केंद्राकडे नुकसान भरपाई ची मागणी केली पण ती अजून पूर्ण झाली नाही. आता हे पथक पाहणी करून गेल्यावर कोणता निर्णय घेतला जाणार आहे? यावर केंद्राची भूमिका ठरणार आहे.