मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी बेळगाव जिल्ह्याच्या पूर स्थितीचा आढावा घेतल्या नंतर केंद्रीत अर्थ मंत्री निर्मला सीतारामन या पूर ग्रस्त भागाची हवाई पहाणी करणार आहेत.उद्या शनिवारी त्या बेळगाव दौऱ्यावर येणार असून पुराचा आढावा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार त्या बेळगावला येत असून पुराची पहाणी करून अहवाल देणार आहेत.
मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा उत्तर कर्नाटकचा दौरा करत पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्या नंतर केंद्र सरकारने पुराला निपटण्यास पाच हजार कोटींची मदत द्या अशी मागणी केली आहे त्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन पहाणी करणार आहेत.
शनिवारी सकाळी दिल्लीहून खास विमानाने त्या सांबरा विमान तळावर दाखल होणार आहेत त्या नंतर भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधून त्या हवाई पहाणी करणार आहेत.केंद्रीय संरक्षण मंत्री असतेवेळी मागील वर्षी त्या बेळगावात आल्या होत्या त्यानंतर त्यांची ही दुसरी बेळगाव भेट असणार आहे.
करणार शहराची पहाणी
केंद्रीय मंत्री अर्थ मंत्री निर्मला सीतारामन शनिवारी सकाळी बेळगावं दौऱ्यावर येणार असून बेळगाव शहरातील पूर ग्रस्त भागाची तसेच मार्कंडेय नदीची पहाणी करणार आहेतसकाळी 10:15 वाजता त्या सांबरा विमान तळावर येणार असून अकरा वाजे पर्यंत शहरातील पूर ग्रस्त भागाची पाहणी करून आश्रय गंजी केंद्रांना भेटी देणार आहेत त्या नंतर मार्कंडेय नदीला भेट देणार आहेत.अकरा वाजता घटप्रभा नदी ब्रिज त्या नंतर संकेश्वर ला भेट देऊन पुन्हा सांबरा येथून बेळगावं व बागलकोट जिल्ह्याची हवाई पहाणी करणार आहेत.