सांबरा विमानतळावर उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त परिस्थितीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली.यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यां सोबत त्यांनी बैठक केली.
बैठकी राज्य सरकारच्या मुख्य कार्यदर्शीनी नुकसानीचा आढावा घेत अंदाजे दहा हजार कोटींची हानी झाल्याची माहिती गृह मंत्र्यांना दिली.गृह मंत्र्यांनी एरियल सर्व्हे केल्यावर आयोजित सभेत त्यांना ही माहिती देण्यात आली. पुराने राज्यात 4 लाख 81 हजार स्थलांतर करण्यात आले असून 22431 घरे कोसळली आहेत प्राथमिक रिपोर्ट नुसार याचे नुकसान 10 हजार कोटींची घरात असल्याची माहिती राज्य सरकारचे मुख्य सचिव टी एम विजय भास्कर यांनी दिली.
विमानतळाच्या सभाकक्षात छायाचित्रे आणि व्हिडिओद्वारे शहा यांना माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.19 एन डी आर एफ च्या टीम काम करत असून कोडगू मध्ये हेलिकॉप्टर ची गरज आहे.महाराष्ट्र कर्नाटकात दोन दिवस पाऊस कमी झालाय अशी माहिती दिली जिल्हा प्रभारी राकेश सिंह यांनी बेळगाव पुराची नुकसानीची माहिती दिली
महाराष्ट्राची देखील पहाणी
राज्यात दहा हजार कोटींचे नुकसान झाले असून तीन हजार कोटी तात्काळ मंजूर करा अशी मागणी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री येडीयुरापा यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्या सोबत विमानातून एरियल सर्व्हे करत पुराची पहाणी केली. दोन तास दहा मिनिटं उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या हेलीकॉप्टर ने एरियल सर्व्हे केला.बेळगावातील सांबरा विमान तळावरून उड्डाण घेत त्यांनी विजापूर बागलकोट अलमट्टी जलाशय तसेच कोल्हापूर सांगली सह सातारा कोयना धरणाची देखील पहाणी केली.
उध्या पासून पुन्हा पूर ग्रस्त भागाचा दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार असून 15 आगस्ट नंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार बाबत चर्चा करू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री येडीयुरप्पा ,केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी,रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी ,राज्यसभा सदस्य डॉ.प्रभाकर कोरे,राज्याचे मुख्य सचिव टी. एम.विजयभास्कर उपस्थित होते.तत्पूर्वी शाह यांचे दुपारी तीन वाजता बेळगाव विमान तळावर मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी स्वागत केलं होतं त्या नंतर त्यांनी पुराचा एरियल सर्व्हे केला होता.