नवरात्रीत महिलांचे एक आगळेवेगळे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदोत्सव सोहळ्याची सुरुवात 29 सप्टेंबर पासून होणार आहे. 29 सप्टेंबर 3 ऑक्टोबर हे नवरात्रीचे पहिले पाच दिवस हा सोहळा होणार असून यंदा या सोहळ्यामध्ये अभिनेते योगेश सोमण मेघश्री दळवी व माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांची व्याख्याने होणार आहेत.
गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी या सोहळ्याच्या निमित्ताने क्लिक मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा होणार आहे. शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी माजी निसर्गाशी जवळीक साधणारी ओढणी ही स्पर्धा होणार आहे. याच दिवशी शुभमंगल साज सर्वसामान्य कला स्पर्धा यामध्ये मुंडावळी बनवण्याची स्पर्धा होणार असून वाचा आणि लिहा बौद्धिक स्पर्धा होणार आहे.
रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी आरोग्यम् धनसंपदा शारीरिक स्पर्धा अंतर्गत ट्राईथेलॉन स्पर्धा होणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी
8971191426, 9449735519, 9480687581, 9964759366 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.