आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन (iskcon)संस्था नेहमीच सामाजिक कामात पुढाकार घेत असते बेळगाव आणि खानापूरवर कोसळलेल्या दुःखात आपले योगदान म्हणून या संस्थेने पीडित आपत्तीग्रस्त लोकांना जेवण पुरवण्यास सुरुवात केली आहे.
बुधवार पासून बेळगाव इस्कॉनच्या वतीने जेवण तयार करून पीडितांना वितरित केले जात आहे.गुरुवारी टिळकवाडी येथील राधा गोकुळानंद मंदिरात तीन हजार लोकांचा प्रसाद बनविण्यात आला होता तो खानापूर तसेच इतर ठिकाणी पाठविण्यात आला.
हा स्वयंपाक बनविण्यासाठी इस्कॉनचे अध्यक्ष श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी स्वतः लक्ष घातले. त्याचबरोबर श्रीराज नारायण प्रभु ,आनंद प्रभू ,रामभद्र प्रभू ,श्रीवत्स प्रभू,व नागेंद्र प्रभू यांनीही सहकार्य केले .आणखी काही दिवस नागरिकांच्या मागणीप्रमाणे हे कार्य चालू राहणार असल्याची माहिती इस्कॉन च्या वतीने देण्यात आली.
बुधवारी इस्कॉनने दिलेली मदत पाहून अनेक नागरिकांनी स्वतः येऊन मंदिरात धान्य, तेल, भाजीपाला सुपूर्द केला तसेच वाटपासाठी मदत केली गुरुवारी 4000 लोकांना जेवणं पाठवून देण्यात आले आहे.