शेवटच्या मिनिटापर्यंत प्रत्येकाला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. पाण्यात अडकलेल्या सात महिन्याच्या गरोदर महिलेला वाचवले. हा सगळा अनुभव अतिशय थरारक होता अशी माहिती देतात बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी बेळगाव पोलीस वायू दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना वाचवण्यात यशस्वी ठरले ही माहिती त्यांनी दिली .
रायचूर मध्ये सहा माणसे पाण्यात अडकले आहेत असं कळताच लवकरात लवकर कारवाई करून आम्ही त्यांना एअरलिफ्ट केले पाण्याची पातळी वाढत होती एअर कमांडर रविशंकर यांनी योग्य नियोजन केले आणि तीन तास पंधरा मिनिटात हेलिकॉप्टरने पोचून मदत केली .
स्थानिक पोलिस निरीक्षक पाण्यात पडला होता त्याने एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेचा नंबर मला दिला मी जेव्हा तीला फोन केला तेव्हा सगळेजण निवारा घरांमध्ये पोचले होते. तीला सांगितलं हेलिकॉप्टर त्यांना शोधण्यासाठी येत आहे एखाद्या घराच्या गच्चीवर अंगावर दिसण्यासारखा रंगाचे कपडे घाला व उभे राहा असे मी त्यांना सांगितले होते. त्यामुळे लाल रंगाची साडी घालून ती महिला उभी होती त्या महिलेला खालून वरती घेणे हे काम जिकिरीचे होते कारण ती गरोदर होती.