अतिवृष्टीमुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्वच पीकं नष्ट झाली आहेत.नदी,नाल्या काठच्या तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थित न झालेल्या शेतीतील पीकं कूजून गेली आहेत.
कांही शेतकऱ्यांनी पुन्हा मिळेल तो भातरोप लावणी सूरु करण्याआधी शेतात, तसेच जी उरलीसुरली पीक आहेत तीथ खतं वापरण अत्यंत गरजेच आहे पण खताचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
ऐन हंगामात खते मिळत नसल्याने शेतकरी त्रासात अडकला आहे बेळगावमधे ज्या कृषी सोसायट्या आहेत तिथे युरीया व ईतर खत उपलब्धच नसल्याने खाजगी दुकानांचा आसरा घ्यावा लागत आहे कांही खासगी दुकानात खते घ्यायला गेल्यास किमतीपेक्षा ५०/६० रु ज्यादा दर मागताहेत. यामूळे आधीच पिचडलेल्या शेतकऱ्यांना पून्हा भूर्दंड पडत आहे.
एकूणच चिंतेत वाढ झाली आहे. तेंव्हा मा.जिल्हाधिकारी,संबधित कृषी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना खत पूरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.