शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांना देखील तडे गेलेत.त्या बरोबर शहरातील अनेक रस्ते खराब झाले असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.आता पावसाने विश्रांती घेतली असून खड्य्या तील धूळ सगळीकडे वाहन गेले की पसरत आहे.
सध्या बेळगावकराना धुळ्याची समस्या भेडसावत आहे खड्ड्यामुळे कंबरदुखी आणि मानदुखीचा त्रास होणाऱ्या दुचाकीस्वारांना आता डोळ्यांची ऍलर्जी होण्याची शक्यता बळावली आहे.
वाहन गेले की खड्ड्यातील माती हवेत उडत असून काही ठिकाणी समोरचे दिसत नाही अशी स्थिती आहे.तर काही ठिकाणी वाळूचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यात जात आहेत.