गणपतीची कृपाच मला गणेशभक्तांची मूर्त्यांची मागणी पूर्ण करायला मदत करणार आहे.अनेकांनी आपल्या गणपतीची मूर्तीची ऑर्डर मारुती ज्योतिबा कुंभारला दिलेली आहे पण पुरामुळे अनेक गणेश मूर्तींना हानी पोचली आहे.
मारुती यांनी गणेशभक्तांच्या ऑर्डर घेतल्या होत्या आणि कामही पूर्णत्वास आले होते.फक्त मूर्तीवर शेवटचा हात फिरवणे शिल्लक होते आणि पूर आला आणि साऱ्या श्रमावर पाणी पडले.मारुती गेल्या अनेक वर्षांपासून इको फ्रेंडली मूर्ती तयार करतात.एक फुटापासून अकरा फुटपर्यंतच्या मूर्तींची ते ऑर्डर घेतात.शास्त्रीनगर मध्ये एक भाडोत्री जागा घेऊन त्यांनी मूर्ती बनविण्यास प्रारंभ केला होता.
सार्वजनिक मंडळांच्या देखील ऑर्डर त्यांनी घेतल्या होत्या पण पुरामुळे मूर्ती इको फ्रेंडली असल्यामुळे पाण्यात विरघळून गेल्या आणि कुंभार याना मोठा फटका बसला.कुंभार हे आपले कुटुंबीय मिळून एकूण सहा जण मूर्ती तयार करण्याच्या कामात गुंतले होते.
गेल्या नऊ महिन्यापासून मूर्ती बनविण्याचे काम सुरू होते पण पुराने दोनशे मूर्तींचे नुकसान झाले.दावणगेरीच्या मंडळाची दहा फुटाची मूर्ती तयार होती,पंच्याऐशी हजार रु.ची पण पुरामुळे ती मूर्ती खराब झाली.
आता कुंभार आपल्याकडे ऑर्डर दिलेल्याना दुसरीकडे मूर्तीची ऑर्डर द्या म्हणून सांगत आहेत.पण काही जुने ग्राहक आम्हाला तुम्हीच मूर्ती करून घ्या म्हणून आग्रह करत आहेत.गणपतीची कृपाच मला गणेशभक्तांची इच्छा पूर्ण करायला आशीर्वाद देणार असा विश्वास कुंभार याना आहे.