केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी बंगलोरहून बेळगावला भेट देऊन शहर आणि परिसरातील पुरस्थितीची पाहणी केली.सांबरा विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी एस.बी.बोमनहळ्ळी यांच्याकडून पूरस्थिती,हानी,मदत कार्य याची माहिती घेतली.
माहिती घेतल्यानंतर थेट त्यांनी धामणे रस्त्यावरील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.नंतर जुने बेळगाव रोडवरील साई भवन येथे भेट देऊन पूरग्रस्त महिलांशी संवाद साधला.
यावेळी महिलांनी आपल्या व्यथा सीतारामन यांच्यासमोर मांडल्या.अत्यंत आपुलकीने पूरग्रस्त महिलांशी संवाद साधून सीतारामन यांनी त्यांना धीर तर दिलाच शिवाय सरकारकडून शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.नंतर शहरातील पूरग्रस्त भागांना देखील त्यांनी भेट दिली.