बेळगाव शहरातील वकील वर्गाने आज सब रजिस्टर कार्यालयात जाऊन सबरजिस्टर ना घेराव घातला. याचे कारण एकच होते या कार्यालयात सुरू असलेला एजंट राज थांबवा, आम्हालाही त्रास होत आहे अशीमागणी या वकिलांनी केली आहे.
बेळगाव शहराच्या सबरजिस्टर कार्यालयाच्या आसपास एजंटांची संख्या वाढली आहे. सकाळपासूनच ते नंबर लावून थांबलेले असतात, येथे कामासाठी येणार्या नागरिकांची सगळी कागदपत्रे एजंटांकडून असतात .ती कागदपत्र घेऊन आम्हाला काम करावे लागते.
या एजंटानी पैसे कमवण्यासाठी वाटेल ते मार्ग निवडले आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सबरजीस्टर यांच्याकडे केल्यानंतर आपण लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करतो असे आश्वासन वकिलांना मिळाले. आहे व
कील संघटनेचे उपाध्यक्ष गजानन पाटील, माजी अध्यक्ष मुरगेंद्रगौडा पाटील, श्रीधर मुतकेकर, आशिष कट्टी, सचिन शिवांनावर, सतीश बिरादार ,लक्ष्मण पाटील, षडाक्षरी हिरेमठ ,प्रवीण सांबरेकर, शिवाजी शिंदे ,सुनील काकतकर , पी एस बेन्नाळकर, वस्त्रद, सचिन मगदूम, राजू मंडोळकर, लाकेश हेगन्नावर, रवि इंचल, सुधीर धामणकर, तीप्पना सनदी हे वकील वर्ग उपस्थित होते.