येळ्ळूर मधील फुटूक तलाव फुटल्या नंतर गावच्या मधोमध असलेला लक्ष्मी तलाव फुटण्याच्या मार्गावर होता मात्र येळ्ळूर ग्रामस्थ आणि पंचायतीच्या आणि जि. पं सद्स्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला आहे.
लक्ष्मी तलावातील पाण्याची पातळीने उच्चांक गाठल्याने तलावाचा बंधाऱ्यांची भिंत काही प्रमाणात सरकली होती त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते लागलीच ग्राम पंचायतीने वतीने तलावात जे सी बी द्वारा गटरमधून पाण्याचा प्रवाह बदलला पाणी पातळी कमी केली या मुळे संभाव्य धोका टळला आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने येळ्ळूर गावचे सर्व तलाव तुडुंब भरले असून ओव्हर फ्लो होत आहेत काल फुटुक तलाव फुटल्याने शेतीत पाणी घुसून शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. गावच्या मधोमध असलेला लक्ष्मी तलावाचा बंधारा सरकल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होती घटनास्थळी लागलीच जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि जिल्हा पंचायत अभियंते बिदरहळळी पाट बंधारे खात्याच्या सहाययक अभियंते यांनी या तलावाला भेट देऊन पहाणी केली तलाव सेफ असल्याचा निर्वाळा दिला त्यामुळं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला.
लक्ष्मी तलावा सोबत मंगाई तलाव अरवाळी डॅम देखील ओव्हरफ्लो झाले आहेत त्या तलावांची देखील पहाणी शासकीय अधिकारी व जि. पं सदस्यांनी केली.या भागातील सर्व ओव्हर फ्लो तलावातून पाणी निचरा करण्यात आला आहे.यावेळी ग्राम पंचायत सदस्य वामन पाटील,शिवाजी पाटील,राजू पावले,शिवाजी गोरल आदी सदस्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.