वेगवेगळ्या अनुदानातून ए पी एम सी ते अलतगा क्रॉस येथील रस्त्याचे नवणीकरण केले जाईल असे ठाम आश्वासन जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्रन यांनी कंग्राळी खुर्द ग्रामस्थांना दिले आहे.मंगळवारी त्यांनी मार्कंडेय नदीचे पूल ए पी एम सी ते अलतगा क्रॉस रस्त्याची पहाणी केली. ग्राम पंचायत कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या आठवड्यात कंग्राळी ग्राम पंचायत आणि जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी जिल्हा पंचायत सी ई ओ यांना निवेदन देत रस्ता दुरुस्त करा अशी मागणी केली होती त्यावर सी ई ओ यांनी गावाला भेट देत पहाणी करण्याचे आश्वासन दिले होते.
ए पी एम सी ते कंग्राळी खुर्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत जवळपास एक की मी चा रस्ता स्मार्ट सिटी फंडातून तर कंग्राळी खुर्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासून हंदीगनूर क्रॉस पर्यंत दीड की मी चा रस्ता जिल्हा पंचायत निधीतून केला जाणार आहे जिल्हा पंचायतीने यासाठी एक कोटी 20 लाखांचा निधी मंजूर केला असल्याचे राजेंद्रन यानी सांगितले.
स्मार्ट व्हिलेज योजनेतून गावातील कामांना चालना
ग्राम पंचायत मध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी कंग्राळी खुर्द गावात केंद्र सरकारची स्मार्ट व्हिलेज ही योजना राबवू असे सांगत प्राथमिक मराठी शाळेत दोन नवीन स्मार्ट क्लास रूम, अलतगा आणि कंग्राळी साठी स्मार्ट बस स्थानक करू असे सांगितले. तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी कलादगी आणि जिल्हा पंचायत अभियंत्यांना स्मार्ट व्हिलेज योजना कंग्राळीत लागू करा अश्या अनेक सूचना केल्या. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील,ग्राम पंचायत अध्यक्षा चंदा पाटील आदी ग्राम पंचायत सदस्य अधिकारी उपस्थित होते.