बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शाप ठरलेला रिंग रोड आणि बायपास रद्द करा अश्या मागणीचा ठराव येळ्ळूर ग्राम पंचायतीत सर्वानुमते संमत करण्यात आला.ग्राम पंचायत सदस्य राजू पावले यांनी येळ्ळूर शेतातून जाणाऱ्या हलगा मच्छे पायपास व रिंग रोड बंद करा व शेती वाचवा असा ठराव मांडला.
बुधवारी दि.03/07/2019 सकाळी 11:00वा. ग्रामसभेला सुरवात झाली. अध्यक्ष स्थानी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष अनुसया परिट होत्या.सर्वप्रथम उदय हुंदरे यांनी ग्राम सभेचे वाचन केले.निसर्गाचे जतन करा व शेतातील झाडे कमी न करता वाढवा झाडे जतन करा असा ठराव माजी ग्राम पंचायत सदस्य सतीश पाटील यांनी मांडला.
बायपास साठी माती अवजड वाहने जात आहेत त्यामुळे येळ्ळूर च्या जनतेला त्रास होत आहे ती वाहने सकाळी 9 ते 11 सांयकाळी 4 ते 6 पर्यंत बंद ठेवावी असा ठराव झाला.माजी उपाध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी यांनी ठराव मांडला.
रेशन कार्ड समस्या बद्दल लोकांनी तक्रारी केल्या त्यावर बायोमेट्रिक पद्धत रद्द करा अशी मागणी केली त्यावर यामुळं लोकांचा फायदा असल्याचे सांगत जनतेच्या शंकेचे समाधान केले.डॉल्बी बंदी आणि गुटखा बंदी ठरावाची अमल बजावणी का पोलीस करत नाहीत असा जाब लोकांनी विचारला.
यावेळी सर्व खात्याच्या आधिकार्यानी आपल्या आपल्या खात्याची माहिती दिली.सभेला.येळ्ळूर ता पं सदस्य रावजी पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य दुध्दाप्पा बागेवाडी,सतिश पाटील, उपाध्यक्ष रुक्मिणी नाईक, ग्रामपंचायत सदस्य. वामन पाटील,राजू उघाडे,शिवाजी गोरल,शिवाजी पाटील, तानाजी हलगेकर,परशराम परिट,राकेश परिट,बाळु पाटील, जयसिंग राजपुत,नम्रता पाटील, भाग्यश्री पाटील, राधा पाटील, लक्ष्मी भातखांडे,मालती कुगजी, राजकुवंर पावले,आनुसया धुळजी,सर्व शाळांचे मुख्याध्यापक, गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.