बेळगाव शहरात ऑटोरिक्षा मध्ये मीटरप्रमाणे भाडे आकरण्याचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही. जिल्हा प्रशासनाने यावेळी पुन्हा एकदा मीटरप्रमाणे भाडे आकारले जाईल अशी घोषणा केली आहे .यासाठी रिक्षाचालकांना 15 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली असून 15 ऑगस्टपासून प्रत्येक रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या मीटर पाहून भाड्याची आकारणी नेमके होणार का? हे अजून स्पष्ट झालेले नाही .
सगळेच नव्हे मात्र बेळगाव शहरातील रिक्षा चालक काही अपवादात्मक प्रामाणिक रिक्षा चालक वगळता प्रतिमा बिघडून आहेत. त्यांच्याकडून मिळणारा अनुभव अतिशय चुकीच्या प्रकारचा आहे पोलिसांनी ज्या पद्धतीने हेल्मेटची सक्ती केली आणि आता बऱ्यापैकी लोक हेल्मेट वापरत आहेत त्याच पद्धतीने मीटरसाठी सातत्याने कारवाई करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. हप्ते खाण्यासाठी म्हणून काही दिवस सक्ती करून त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या केल्यास मीटरप्रमाणे भाडे आकारणी होणार नाही. अशी परिस्थिती आहे .
बेळगाव शहरातील नागरिकांना रिक्षाचालकांच्या मनमानी भाडे वसुलीचा अनुभव वारंवार होऊ लागला आहे .कॅम्प येथून आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेलेल्या एका मुलीला परत येताना स्कूटर चालू झाले नाही म्हणून रिक्षाचा आधार घ्यावा लागला .त्यावेळी टिळकवाडी ला जाण्यासाठी रिक्षाचालकाने 160 रुपयांची मागणी केली. घासाघीस केल्यावर दहा रुपये सोडतो मात्र एकशे पन्नास रुपये द्या असे त्यांनी सांगितले. हे दर न परवडणारे असे त्या महिलेने सांगितले.
सध्या एक रिक्षाचा फोटो आणि नंबर सोशल मीडियावर फिरत असून बेळगाव बस स्टँड पासून माळमारुतीपर्यंत जाण्यासाठी 180 त्याने घेतल्याचे पसरले, त्या रिक्षाचालकाला इतके भाडे का असे विचारले असता तुम्ही काय पाहिजे ते करा असे त्यांनी सांगितले ,त्यामुळे पोलीसांची संपर्क साधून त्याचा नंबर व्हायरल करण्यात आला, मात्र तरीही त्याच्यावर कारवाई झालेली नाही, आता जिल्हा प्रशासनाने 15 ऑगस्ट ची तारीख दिली आहे त्यानंतर रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे घेतात की पुन्हा मनमानी सुरूच ठेवतात हे प्रशासनाच्या कारवाईच्या स्वरूपावर कळणार आहे.