सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने बुधवारी काही काळ विश्रांती घेतली आहे नदी-नाले एकत्र झाल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे यामुळे सारे जण सुखावले असून आणखी काही दिवस पाऊस जाऊ दे रे बाबा अशी मागणी करत आहेत
सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरले होते याचा फटका अनेक नागरिकांना बसला तर नदी-नाला परिसरात असलेल्या शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे त्यामुळे आणखी पाऊस झाल्यास त्याचा मोठा फटका बसणार होता मात्र बुधवारी बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्याने दिलासा मिळाला आहे
बुधवारी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र संततधार पाऊस पडली नसल्यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी आणखी दिवसानंतर पावसाची पुन्हा गरज भासणार आहे. यामुळे सध्या जरी पाऊस नको असला तरी आणखी दिवसांनी म्हणजेच गणपती नंतर हा पाऊस हवाच आहे.
मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय तुडूंब केले आहे. त्यामुळे बेळगावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता आणखी काही दिवस पाऊस नको रे बाबा अशी मागणी होत आहे.