गेल्या आठवडा भरा पासून होत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशयाची पाणी पातळी 9 फुटांनी वाढली आहे. तिलारी तुडिये आदी भागात होत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय भरू लागले आहे.
गेल्या आठवड्या नंतर एकूण 9 फुटांनी ही पातळी वाढली आहे.तळातून पाणी उपसा करणारे पंप काढण्यात आले आहेत थेट पाणी उपसा करून जल शुद्धीकरण केंद्राला पाठवले जात आहे.
सोमवारी ही पाण्याची एकूण पातळी 2452 फूट होती तर बुधवारी दुपारी ही पातळी 2453 फूट अशी वाढली आहे.जवळपास साडे सहा फूट पाणी या डॅम मध्ये आहे. जलाशय फुल्ल होण्यासाठी 2478 फूट पाणी लागतंय आता आगामी दिवसांत आणखी पाऊस झाल्यास ही पाणी पातळी वाढणार आहे