वर्दीच्या रिक्षा बंद मुळे होत असलेल्या त्रासाने कंटाळलेले पालक आता नगरविकास मंत्री यु टी खादर यांची भेट घेणार आहेत. उद्या शुक्रवारी सकाळी नगरविकास मंत्री हे महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी पोलीस आयुक्त आणि महा पालिका आयुक्तांकडे पालकांच्या भेटी संदर्भात वेळ मागितला आहे.
वर्दीच्या रिक्षांची समस्यां नगरविकास मंत्री खादर यांच्या कडे मांडली जाणार असून पालकांनी महापालिकेत यावे असे आवाहन प्रवीण किल्लेकर,विनायक गुंजटकर, माया बडीगेर रिजवान के अशोक पाटील आदी पालकांनी केलं आहे.
असे असतील नगर विकास मंत्र्यांचे कार्यक्रम
यु टी खादर शुक्रवारी सकाळी 9 ते 11 पर्यंत महा पालिकेत स्मार्ट सिटी कामांचा आढावा तर 11 वाजता जनतेकडून तक्रार अर्ज स्वीकाणार आहेत. या शिवाय 12 ते 1 या काळात पालिकेच्या विकास कामांचा आढावा बैठक-दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद अडीच वाजता बुडा संदर्भात तक्रारी जनतेकडून अहवाल घेणार तर साडे तीन वाजता बुडाची विकास आढावा बैठक घेणार आहेत.पाच वाजता पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी बैठक तर सहा वाजता काँग्रेस कार्यालयाला भेट देणार आहेत.