राज्य रहदारी नियंत्रण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वाहतूक विभागाचे राज्य आयुक्त पी एस संधू यांनी आज बेळगावला भेट दिली.यावेळी कुमार गंधर्व रंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांच्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला.
अलीकडेच वाढत्या अपघाता संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे केली जावी तसेच बेकायदेशीर रित्या कामगार शाळा मुलांची वाहतुकीला आळा घातला हा उद्देश पोलीस खात्याचा असल्याने त्यांनी काटेकोर अंमलबजावणी बेळगाव पोलिसांनी जी मोहीम राबवली याचे मला समाधान वाटते या बद्दल बेळगावचे पोलीस अभिनंदनास पात्र असल्याचे संधू म्हणाले.
अलीकडे ऑटो चालकांनी वर्दी रिक्षा बंद केल्याने विद्यार्थी व पालक वर्गाला जो नाहक त्रास झाला त्याबद्दल संधू यांनी नाराजी व्यक्त केली मात्र यापुढे पोलीस व प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना सहकार केल्यास बरे होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यापुढे सुद्धा नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघाताला पायबंद घालण्यास मदत करावी असे देखील आवाहन संधू यांनी केले.
यावेळी बेळगाव उत्तर पोलीस महा निरीक्षक एच एस राघवेंद्र सुहास,शहर पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार, विजापूर एस पी प्रकाश निकम,कायदा सुव्यवस्था विभागाचे डी सी पी सीमा लाटकर ,गुन्हा व रहदारी नियंत्रण विभागाच्या डी सी पी यशोदा वंटगुडी तसेच ए सी पी पोलीस निरीक्षक,परिवाहन खात्याचे अधिकारी ,के एस आर टी सी,कामगार सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.