पाहिल्याचं पावसाच्या दणक्यात गोगटे सर्कल उड्डाण पुलाच्या निर्मितीत भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप करत रेल्वे अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्या द्वारे निवेदन देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे. गोगटे सर्कल वरील एल सी 126 अ हा ब्रिज सहा महिन्यानपूर्वी बनवण्यात आला होता केवळ एक महिन्यातच रस्ता खचला होता इतकेच काय तर पहिल्यांच पावसाच्या दणक्याला फुटपाथ व रस्ता खचला आहे त्या ठिकाणी दुरुस्ती काम सुरू झाले आहे मात्र बेळगावच्या या ऐतिहासिक ब्रिटिश कालीन ब्रिज निर्मितीत भ्रष्टाचार झाला आहे कमी दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले आहे याची कामाची चौकशी करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बेळगाव शहरात आता पर्यंत रेल्वे खात्याने तीन ब्रिज बांधले आहेत तिन्ही ब्रिजांचा दर्जा म्हणावा तेवढा चांगला नाही त्यामुळे यात नक्कीच भ्रष्टाचार झाला आहे.गोगटे सर्कल ब्रिजचे काम तर अगदी हीन दर्जाचे झाले त्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये घाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा ही मुख्य मागणी आहे असे भ्रष्टाचार निर्मुलन परिवारचे अध्यक्ष सुजित मूळगुंद यांनी बेळगाव live कडे दिलेल्या मुलाखातीत सांगितलं तर जर का ब्रिज बनवताना लोकप्रतिनिधीनी श्रेय घेण्यासाठी गडबड करायला लावली असेल तर त्यांच्या वर देखील कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केलीये.
ब्रीजच्या उदघाटनप्रसंगी श्रेय घेणारे ब्रिजचे फुटपाथ रुतल्या वर कुठे आहेत?ते आता का ब्रिज कडे फिरकायला तयार नाहीत असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.