गोरक्षक शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करावी.पोलीस खाते शिवू उप्पारची आत्महत्या असल्याचे दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवू उप्पारने आत्महत्या केली आहे असे पोलिसांनी स्वतः जबाब लिहून शिवू उप्पारच्या आई,वडिलांची सही घेतली आहे.शिवू उप्पार मृत्यू प्रकरणाची चौकशी त्वरित झाली नाही तर बेळगाव बंद करण्यात येईल असा इशारा श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सिपीएड मैदानावर आयोजित हिंदू संघटनांच्या मेळाव्यात दिला.व्यासपीठावर अनेक मठाधिश उपस्थित होते.
शहर पोलीस आणि जिल्हा पोलिस शिवू उप्पार प्रकरणी एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत.शिवू उप्पारला धमक्या दिल्या जात होत्या.जिल्ह्यातील बलिष्ठ राजकारणी या प्रकरणात आहेत,असा आरोपही प्रमोद मुतालिक यांनी केला.शिवूच्या आईने दुसरी तक्रार दिले पण त्याची चौकशी केली जात नाही असेही मुतालिक म्हणाले.
मेळाव्याला करणेश्वर मठाचे सिद्धलिंग स्वामीजी,हावेरीचे प्रणवानंद स्वामीजी,चित्रदुर्गचे सेवालाल स्वामीजी,सदलगाचे धरेश्वर स्वामीजी,गंगाधर कुलकर्णी,शिवू उप्पारचे वडील बलराम उप्पार,आई गंगम्मा उप्पार आणि राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.सिपीएड मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाने जावून शिवू उप्पारच्या मृत्यूची चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले.