ग्राम पंचायतीच्या नोटीशी घरपट्टी सह इतर कागदपत्रे मराठीतुन दिल्याचा ठपका ठेवत हिंडलगा ग्राम पंचायतीच्या पी डी ओ वसंता कुमारी यांना जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्य सरकारची भाषा कन्नड असताना ग्राम पंचायतीची कागदपत्रे कन्नड मधून का दिली? राज्य भाषा न वापरल्याने तुमच्या वर का कारवाई केली जाऊ नये असे नोटिशीत विचारणा झाली आहे.आगामी तीन दिवसाच्या आत या नोटिशीला उत्तर द्या असे देखील नोटीस मध्ये म्हटले आहे.
गेल्या आठवड्यापूर्वी कन्नड प्राधिकरण बैठकीत कन्नड संघटनांच्या तक्रारी वरून डी सी ऑफिस मध्ये झालेल्या बैठकीत पी डी ओ निलंबित करण्याच्या डी सी बोमनहळळी यांनी जिल्हा पंचायत सी ई ओ याना केली होती त्यानुसार सी ई ओ राजेंद्रन यांनी पी डी ओ वसंत कुमारी यांना पहिली नोटीस बजावली आहे.
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या ठरावा नुसार गेल्या कित्येक वर्षा या ग्राम पंचायतीचा कारभार मराठीतूनच चालतो मात्र जिल्हा प्रशासनाने कन्नड ऐवजी मराठीतून कारभार केल्याचा ठपका पी डी ओ वर ठेवला आहे.सदर पी डी ओ कायदेशीर सल्ला घेऊनच नोटिशील उत्तर देण्याची तयारी चालवली असल्याची माहिती मिळत असून समितीच्या शिष्टमंडळाने देखील याबाबत जिल्हा पंचायत सी ई ओ यांच्याशी चर्चा केली आहे.