पत्नीपासून दुरावलेल्या पतीचे मनपरिवर्तन करतो असे सांगून एका भोंदू ज्योतिषाने दोन लाख साठ हजार रु.घेतलेल्या ज्योतिषाला एपीएमसी पोलिसांनी गजाआड केले आहे.
बेळगाव शहरातील एका महिलेने पेपरमधील श्री साई दुर्गादेवी ज्योतिषालायचा पंडित व्ही.आर.गुरुजीची भेट घेतली.त्यावर त्या भोंदू ज्योतिषाने पतीचे मनपरिवर्तन करण्यासाठी पूजा आदी करावी लागेल म्हणून सांगितले.नंतर ज्योतिषाने त्या महिलेच्या मोबाईलवरून आपल्या खात्यावर दोन लाख साठ हजर रु जमा करून घेतले.
नंतर त्या महिलेला ज्योतिषाने आपल्याला फसविल्याचे ध्यानात आले.या संबंधी महिलेने एपीएमसी पोलिसात तक्रार नोंदवली.तिषाशी संपर्क साधून पती आपल्यापासून दुरावला असल्याचे सांगितले.
विजयकुमार रामन्ण्णा सुगते (४०) रा.हट्टी, जिल्हा रायचूर असे त्या ज्योतिषाचे नाव असून त्याला पोलिसांनी बंगलोर येथून अटक करून त्याच्याकडून एक लाख तीस हजार रु हस्तगत केले.