Thursday, January 2, 2025

/

मराठा सेंटरचे सुभेदार बनले टीम इंडियाचे कोच

 belgaum

बेळगावच्या मराठा सेंटरचे सुभेदार रामचंद्र मारुती पवार हे ज्युनियर महिला कुस्ती टीम इंडियाचे कोच बनले आहेत.पवार हे बेळगाव जवळील चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावचे सुपुत्र आहेत.या निवडीमुळे सुभेदार आर एम पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या लखनौ येथील प्रशिक्षण केंद्रात 3 जून ते 14 आगष्टच्या दरम्यान प्रशिक्षण सुरू आहे यामधून निवडल्या गेलेल्या संघाला 9 ते 13 जुलै दरम्यान थायलंड येथे होणाऱ्या आशियायी ज्युनियर कुस्ती स्पर्धा तसेच 12 ते 18 आगष्ट येथे ईस्टोनिया (युरोप)येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कोच म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. याआधी त्यांनीअर्जेंटिना येथील युवा ऑलम्पिक स्पर्धेत सह अन्य स्पर्धेत उल्लेखनीय कामगीरी केली आहे.

Subhedar ram pawar

वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून ते आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण मांडेदुर्ग येथील तालिम मध्ये आपल्या वडिलांकडून कुस्तीचे धडे घ्यायचे.लक्ष्मणही सैन्यदलात कार्यरत आहे.राम लक्ष्मण ह्या दोन भावानी लहानपणापासून कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी दाखवली. आसपासच्या परिसरातील कुस्ती आखाड्यात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता.

वडील मारूती पवार त्यावेळचे नामांकित पैलवान, नेहमी अधुनिकतेची जोड देत सगळ्या गोष्टी पार पाडणारे शेतकरी. आपली मुलं पैलवान झाली पाहिजे यासाठी या वडिलानं खूप खस्ता खाल्या. त्यांचा कुस्तीतील गुरू म्हणूनच काम पाहिलं. आज या आपल्या मुलाच्या यशानं त्यांची छाती गौरवानं फुलली आहे.मांडेदुर्ग या गावी त्यांनी अधुनिक पध्दतीच कुस्ती केंद्र उभारण्याच काम सुरू केलंय. राम लक्ष्मण ह्या दोन जुळ्या भावानी लहानपणापासून कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी दाखवली. आसपासच्या परिसरातील कुस्ती आखाड्यात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता.दोघा भावांनी दोन डझनहून अधिक सुवर्ण पदके राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती मध्ये पटकावली आहेत.

न्यूज अपडेट :अनिल तळगुळकर चंदगड

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.