प्रचंड शेतकऱ्यांचा विरोध तालुक्यातील 33 गावांच्या जमिनी जाणार यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश अशा परिस्थितीत आज पासून केंद्रीय पथक आणि महामार्ग प्राधिकरण रिंग रोडचे मार्किंग करणार आहे.
कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त देण्यात येणार आहे. रिंग रोड साठी 427.17 हेक्टर जमीन घेण्यात येणार असून 68.03 किलोमीटर लांबीचा हा रस्ता होणार आहे. त्याची रुंदी 200 फूट असणार आहे .शेतातून जाणारा मार्ग 200 फुटाचा कशासाठी असे म्हणणे मांडून शेतकऱ्यांनी याला विरोध केला .त्यामुळे शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत तरी रिंग रोडचे मार्किंग होणार आहे.
यापूर्वी स्थानिक अधिकारी रिंग रोडच्या मार्किंग ला गेले असता त्यांना पिटाळून लावण्यात येते त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात केंद्रीय पथक काम करणार असून मार्किंग झाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना नोटीस देऊन हरकती मागवून घेतले जाण्याची शक्यता आहे