बेळगाव शहरातील दुकानावर मोठ्या अक्षरांत कन्नड मध्ये फलक न लिहिणाऱ्या व्यापारी दुकानदारांची लायसन्स रद्द करा अशी सूचना देखील जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांनी महा पालिका आयुक्तांना दिली आहे याशिवाय सरकारी कार्यालयातील सर्व पत्र व्यवहार कन्नड मध्येच करा केंद्र सरकारला लिहिणारी पत्र देखील पत्र कन्नड भाषेत लिहा असा फतवा जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी काढला आहे.
गुरुवारी कन्नड भाषा सक्ती वर अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ बी एस लोकेश कुमार,प्रांताधिकारी कविता योगप्पनवर,अप्पर जिल्हाधिकारी बोधप्प कन्नड सघटनांचे माजी महापौर सिद्धनगौडा पाटील यांच्यासह कन्नड संघटनांचे कार्यकर्ते हजर होते.
निपाणी नगरपालिकेचे 100%कानडीकरणं करा अश्या सक्त सूचना त्यांनी निपाणी प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या निपाणी शहरातील तील सर्व दुकाने शासकीय कार्यालयावरील फलक कन्नड भाषेत लावा अश्या देखील त्यांनी सूचित केले.
झारखंड मध्यप्रदेश महाराष्ट्र मध्ये सर्व शासकीय कार्यालयात त्या राज्यांच्या भाषेत चालतो बेळगावात देखील कन्नड सक्ती करा असा आदेश त्यांनी बजावला आहे.बेळगावात शासकीय कार्यालयात इतर भाषांना प्राधान्य देऊ नये 100%कन्नड भाषा सक्ती करा अशी मागणी कन्नड प्राधिकरण बैठकीत करण्यात आली.शासकीय कार्यालयातील दिली जाणारी कागदपत्रे, अर्ज नोटिसा आदी कन्नड भाषेतच दिली जावी याचा आग्रह कन्नड कार्यकर्ते करताना दिसत होता.
बैठकीच्या सुरुवातील कन्नड संघटनांनी जिल्हाधिकारी बोमनहळळी यांना बोलायला दिले नाहीत कन्नड सक्तीची जोरदार मागणी लावून धरली. एकीकडे कन्नड शाळांमध्ये देखील विध्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना या मागणीचा त्यांना विसर पडला केवळ मराठी द्वेषा पोटी कन्नड सक्तीची मागणी करताना कन्नड जनजागृती वेदिकेचे कार्यकर्ते दिसत होते.