मोकाट कुत्र्यांचा हैदोस डोकेदुखी ठरत आहे. ठीक ठिकाणी जमणारी मोकाट कुत्री त्रास देत आहेत, नागरिकांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ले करत आहेत ,अशा परिस्थितीत महानगरपालिकेने मात्र नसबंदीची मोहीम सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील सहा महिन्यात महानगरपालिकेने 900 कुत्र्यांची नसबंदी केली आहे .अशी माहिती मिळाली आहे. महानगरपालिकेने मध्यंतरी हे काम बंद केले होते. त्यामुळे कुत्र्यांची संख्या रस्त्यावर वाढली होती. आता यावर बंदोबस्त करण्यासाठी या कुत्र्यांना धरून त्यांची नसबंदी करण्याचे काम महानगरपालिकेने सुरू केले असल्याची माहिती एका इंग्रजी दैनिकाने छापली आहे .
गेल्या सहा महिन्यात 900 कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात आल्यामुळे व निरबीजीकरण झाल्याने यापुढील काळात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याकडे भर देण्यात आला होता.
याच बरोबरीने शहरात सध्या उपलब्ध मोकाट कुत्र्यांची संख्या पाहता महानगरपालिकेने दैनंदिन पातळीवर कुत्र्यांना पकडून घेऊन हे काम करण्याची गरज आहे .महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. मोकाट कुत्र्यांची नसबंदी चे काम काही काळापुरते करण्यात येते. त्यानंतर महानगरपालिका पुन्हा हे काम थांबवते .त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
हा त्रास अनेकदा जीवघेणा ठरतो .अनेक लहान मुलांवर बेळगाव शहरात हल्ले झाले असून न्यायालय आवारात न्यायाधीशांच्या मुलांवरही कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
मात्र महानगरपालिकेला अद्याप गंभीरता आलेला नाही. महानगरपालिकेने फक्त नऊशे कुत्र्यांवर मर्यादित न राहता या पुढील काळात आणखी कुत्र्यांची संख्या वाढवून निर्बीजीकरण करावे व त्यांचा बंदोबस्त करावा अशी माहिती मागणी होत आहे.