सभापतीनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या चौदा आमदारांच्या अपात्रतेबद्दल ची घोषणा केली आहे. यापूर्वी तीन आमदारांना अपात्र ठरविण्यात आले होते. यामुळे एकूण आमदारांची संख्या 17 झाली आहे ज्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडियुराप्पा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्या ते विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरणार आहेत.
224 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या जवळ बहुमतासाठी 113 आमदार असणे आवश्यक आहे. आता एकूण 17 आमदारांना अपात्र ठरविण्यात आल्याने सभागृहाची सदस्य संख्या घटली असून बहुमतासाठी भाजपला एकशे अकरा पर्यंत आकडा गाठावा लागेल.
भाजपकडे एकशे पाच आमदार आहेत, काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो त्यामुळे उद्या भाजप आपले बहुमत सिद्ध करू शकेल. अशा शक्यता आहे. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली असून कर्नाटक राज्याचे ते 26 वे मुख्यमंत्री ठरणार आहेत.