पावसाळा आला की शहर आणि परिसरात खड्डे पूर्व स्वरूप धारण करतात. त्यामुळे अनेकांना याचा नाहक फटका बसतो. प्रशासन दरवर्षी नवीन रस्ता नवीन डांबरीकरण आणि इतर सर्व काही प्रयत्न करत असले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. मूळात रस्ते करण्यासाठी भ्रष्टाचार फोफावला आहे. त्यामुळेच रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे.
गोगटे सर्कल उड्डाण पुलाच्या पायथ्याशी मराठा मंदिर समोर,गोवावेस डाक सर्कल ते मराठा सांस्कृतिक भवन दानम्मा देवी मंगल कार्यालय समोर आणि फोर्ट रोड जुने भाजी मार्केट चौकात इतके मोठे खड्डे भर रस्त्यात निर्माण झाले आहेत की ज्यामुळे अनेक अपघात होत आहेत या वरील तीन खड्ड्या सारखे हजारो खड्डे सध्या शहरात निर्माण झाले आहेत ते अपघातासाठी आमंत्रण बनले आहेत.वरील तीन रस्त्यावरून अनेक गणपतीचे गाडे ये जा करत असतात त्यामुळे गणेश सदर रस्ते दुरुस्त करा अशी मागणी वाढू लागली आहे.
(Photo: खड्डा मराठा मंदीर समोरचा)
2 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणरायांचे आगमन करण्यासाठी सारे शहरच आणि परिसर तयारीला लागले असताना दुसरीकडे प्रशासन रस्ते करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षीच रस्त्यांची डागडुजी करण्यात येते मात्र पहिल्या पावसातच त्या रस्त्यांची अवस्था दयनीय होऊन बसते. त्यामुळे या वर्षीही असाच प्रकार करून कोट्यावधी निधी खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. यावर रामबाण उपाय शोधण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
(Photo: खड्डा फोर्ट रोड भाजी मार्केट समोरचा)
खड्ड्यांमुळे शहरात साधे चालणेदेखील अवघड झाले आहे. पाऊस पडताच खड्डे वर येतात. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. प्रशासन मात्र ढिम्म असून दरवर्षी नवीन रस्ता नवीन निधी असा प्रकार सुरू आहे. याच्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी दर्जेदार रस्ते करण्याची गरज निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि मनपा प्रशासन यांच्या मिलीभगतमुळे शहरात असे प्रमाण वाढले आहे.
(Photo: खड्डा म.फुले रोड दानम्मा देवी मंगल कार्यालय समोरचा)
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यावधी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र या निधीचा वापर रस्त्यासाठी होतो का? हा प्रश्न चिंताजनक आहे. रस्ते तयार करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊनच आणि दर्जेदार साहित्य वापरूनच केल्यास वारंवार होणारी समस्या मिटणार आहे. रस्त्यावरून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. याचा विचार प्रशासन कधी करणार? यापुढे तरी दर्जेदार रस्ते करावे, अशी मागणी होत आहे.