बेळगाव शहराच्या भोवताली तयार केला जात असलेला रिंग रोड ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी या रिंग रोडसाठी जाणार असतानाही आणि शेतकर्यांचा प्रचंड विरोध होत असतानाही ऑगस्टपासून काम होण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना अनेक वेळा पिटाळून लावले आता शेतकऱ्यांनी कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत तीन हजार कोटी खर्च करून हा रिंग रोड होणार आहे.
मागील वर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याची घोषणा केली आहे . देसुर डेपो पासून सुरुवात करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर बेंनाळी नजिक तसेच हिंडलगाला जोडून विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पर्यंत या पद्धतीने हा रोड होणार आहे तर दुसऱ्या बाजूने बेन्नाळी ला सुरू होऊन येथील सुवर्ण विधानसौध ला जाऊन पोहोचणार आहे. या मार्गातून जाणार असून परिसरातील दहा किलोमीटर आरक्षित वनविभागात हा मार्ग जाणार आहे .
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या संदर्भात हरकती मागवल्या होत्या अनेक जागामालकांनी आपल्या हरकती दाखल केल्या मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मार्किंग करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, त्याला शेतकर्यांनी विरोध केल्यानंतर आज केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली ,यामुळे आता ऑगस्टपासून कामाला सुरू होणार असून आमची सुपीक जमीन गेली तर आम्ही जगायचे कसे असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत