कर्नाटक मधील काँग्रेस जेडीएस प्रणित युती सरकार पडण्यास बेळगाव जिल्ह्यातील पीएलडी बँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक कारणीभूत ठरली आहे. या अध्यक्षपदाने जारकीहोळी बंधुत फूट पाडवली आणि संघर्ष पेटला गेला. असंतोष वाढत जाऊन वणवा भडकला आणि काँग्रेस मधील या बेबनावाचा फटका सरकारला भोगावा लागला.
या बँकेच्या अध्यक्ष पदावरून नेते लक्ष्मी रमेश आणि सतीश यांच्यातला वाद विकोपाला गेला कालांतराने ते अध्यक्षही वारून गेले आज तीच बँक राज्य सरकारला महागात पडली हा वाद विकोपाला गेला त्यातच डी के शिवकुमार यांची बेळगाव एन्ट्री देखील सरकारला महागात पडली आहे.
पीएलडी बँकेवर आपल्या मर्जीतील अध्यक्ष करण्याची आसुरी स्पर्धा झाली होती. यावरून विधानसभा निवडणुकी पर्यंत चांगले संबंध असलेले रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात वैमनस्य झाले. अखेर समितीमधील काही नेत्यांना पैसेही वाटण्यात आले पण विजय सतीश जारकीहोळी यांनी आपला करून घेतला. त्यानंतर जास्तच दुखावले गेलेले रमेश जारकीहोळी यांनी वेगळी चूल मांडायला सुरुवात केली.काँग्रेस बैठकांना अनुपस्थित राहून त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे उघड केली. आपल्या सारखेच असंतुष्ट आमदार त्यांनी जमविले. खासदारकीच्या निवडणुकीतही हेच दिसले त्यामुळे काँग्रेसला घरघर लागली.
केंद्रातील भाजपचा विजय आणि कर्नाटकातही काँग्रेस जेडीएस युती सरकारचा झालेला पाडाव हे बेळगावच्या पीएलडी बँकेमुळे घडले हे विसरता येणार नाही.पीएलडी बँक निवडणुकी पूर्वी रमेश जारकीहोळी यांच्याकडील पालकमंत्री पद काढून घेऊन सुद्धा त्यांना दुखवण्यात आले होते, या पक्षप्रमुखांच्या निर्णयाने सरकारला तेंव्हाही हादरे दिले होते, आता नवीन सरकार मध्ये रमेश जारकीहोळी हे भाजपचे उपमुख्यमंत्री होणार आहेत.
काँग्रेसने त्यांचे पालकमंत्री पद जरी शाबूत ठेवले असते तर ही वेळ आली नसती असे आता काँग्रेस गोटात बोलले जात आहे.बेळगाव ग्रामीण भागातल्या या छोट्याश्या पथ संस्थेच्या अध्यक्ष पदावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला गेलं मैत्री सरकार त्यामुळे ही बँक जायंट किलर ठरली अशी चर्चा वाढू लागलीये.