बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम पाहत असलेल्या सुधीर कुमार रेड्डी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी यापूर्वी बल्लारी ला पोलीस प्रमुख असलेले लक्ष्मण निंबर्गी यांना नेमण्यात आले आहे.
निंबर्गी यांनी यापूर्वी उडुपी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम पाहिले होते .एक धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी ते काय प्रयत्न करणार याकडे बेळगाव जिल्ह्याचे लक्ष आहे.
सुधीर कुमार रेड्डी यांनी सलग दीड ते दोन वर्षे बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून काम पाहिले असून त्यांची बदली झाली.
All news belgaum district . Sabmet