belgaum

बळळारी नाला शेतकऱ्यांना ठरतोय ‘शाप’

0
451
Flood bellari nala
 belgaum

बळळारी नाला हा शेतकऱ्यांना शाप ठरलाय.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याला पूर आला असून त्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरल्यामुळे बासमती सारखे भट पीक पाण्याखाली गेले असून शेतकरी चिंताग्रस्त झालाय.सलग सातव्या वर्षी शेतकऱ्यांना नाल्याच्या पुराचा फटका बसला आहे.

या अगोदर साधारण सातशे एकर जमिनीवर नाल्याच्या पुराचे पाणी पसरत होते पण यावर्षी एक हजारहून अधिक जमिनीवर नाल्याच्या पुलाचे पाणी पसरले आहे.2007-2008 मध्ये एकदा तीन कोटींचा निधी नाल्यातील गाळ काढण्यासाठी मंजूर झाला होता पण तेव्हाही व्यवस्थित गाळ काढला गेला नाही.गेली अनेक वर्षे शेतकरी नाल्यातील गाळ काढण्याची मागणी करत आहेत पण कोणीही त्याकडे लक्ष देत नाही.त्यामुळे शेतकऱ्याला नाल्याच्या पुरामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.

हा नाला तीस किमी वाहतो.या नाल्यात कारखाने,दवाखाने आणि अन्य व्यावसायिक सगळा कचरा टाकतात.त्यामुळे नाल्यातून पाणी वाहत नाही.नाल्यातील पाणी शेतात पसरते आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना या नाल्याच्या पाण्यामुळे आता त्वचारोग होऊ लागले आहेत.पूरात हरवला बळ्ळारी नाला,वडगावला येऊन लागला पूर अशी काहीशी परिस्थिती बेळगाव शहरा लगतच्या शेत जमिनीची बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.