एपीएमसी मध्ये नव्याने सुरू असलेल्या भाजी मार्केटच्या गाळ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून यामध्ये सदस्य आणि अधिकारी यांची मिलीभगत असल्याचे समोर येऊ लागले आहे. 30 गाळ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित असून तो लिलाव करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दिनांक 27 मे रोजी गाळ्यांचा टेंडर पास करण्यात आला होता. मात्र याला काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले होते. हाच टेंडर पुन्हा लवकरात लवकर घ्यावा असा आदेश कृषी उत्पन्न बाजार समिती कर्नाटक बेंगलोर कडून पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागणार अशी आशा होती मात्र तसे झाले नाही.
काही अधिकारी आणि सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे हा प्रश्न लांबणीवर जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे पाहता एपीएमसी भाजी मार्केटमध्ये 132 गाळे आहेत त्यामधील 102 गाळे लिलाव झाले आहेत. तर उर्वरित 30 गाड्यांचा प्रश्न प्रलंबित होता. आता यातील सगळ्यांबाबत लिलाव प्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र काही सदस्य आणि अधिकारी यांच्यात नाक खुपसत असल्यामुळे हा प्रश्न लांबणीवर पडत आहे.
भाजी मार्केट मधील उर्वरित गाळ्यांसाठी 54 जणांनी अर्ज केले आहेत. त्यामधील 3 गाळे अनुसूचित जाती जमाती साठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अर्ज केलेल्यांनी अध्यक्ष सेक्रेटरी आणि सदस्यांना चांगलेच धारेवर धरले होते. हा प्रश्न जर लवकरात लवकर मार्गी लावण्यात आला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे यामध्ये नेमके कुणाचे धावत आहे. याचा विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.
सेक्रेटरी आणि काही सदस्यांनी हात मिळवणी करून उर्वरित गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला असल्याची माहिती उघड झाली आहे. केवळ काही कमिशनमुळे हे सारे सुरू असल्याचे आरोप ही सध्या होऊ लागले आहेत. त्यामुळे जर येत्या चार-पाच दिवसात या गाळ्यांचा प्रश्न निकालात लागला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू असा इशारा अर्जदारांनी केला आहे.