सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी ए पी एम सी मार्केट यार्डात उरलेल्या तीस दुकानांचा लिलाव करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार अर्जदारांनी केली आहे.लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी अर्ज दाखल केलेल्यानी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांची भेट घेऊन केली आहे.
मार्केट यार्डात काही सदस्य अधिकाऱ्यांमुळेच भाजी मार्केट मधील गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.5 जुलै 2019 रोजी पुन्हा त्याच नियमानुसार 2004 च्या कायदानुसार ए पी एम सी मुख्य कार्यालयाकडून लिलाव घ्या अशी नोटीस येऊनसुद्धा लिलाव घेण्यास टाळाटाळ केली जात आहे अशी तक्रार भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यांनी केली आहे.एकूण 30 गाळ्या पैकी 23 सामान्यांसाठी तर 7 अनुसूचित जाती आणी अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत.
।
ए पी एम सी मुख्य कार्यालयाकडून नोटीस येऊनसुद्धा समीतीमध्ये या विरोधात ठराव मांडून न्यायालयाचा अपमान करून कायद्याच उलंघन ए पी एम सी समिती करत आहे असा देखील आरोप यावेळी त्यांनी केला.
पहिल्यांदा दि 20/02/2019 रोजी ए पी एम सीच्या मुख्य कार्यालयाकडून 30 गाळ्यांच्या लिलावासाठी समीतीने अर्ज मागविले होते त्यानुसार लिलाव घेण्याची तारीख 23/05/2019 होती परंतु लोकसभा निवडणूकीचा निकाल याच दिवशी असल्याच कारण सांगून लिलाव 4 दिवस पुढे ढकलण्यात आला होता मात्र 27/05/2019 रोजी लिलाव प्रक्रिया काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 29/06/2019 रोजी पुन्हा त्याच प्रकारे 2004 च्या कायदानुसार लिलाव घ्या असा आदेश कृषी उत्पन्न बाजार समीती बंगळुरू कडून आला आहे मात्र लिलाव घेण्यास आधिकारी टाळाटाळ करत आहेत असेही त्या अर्जदारानी म्हटले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी निवेदनाचा स्वीकार करत ए पी एम सी सचिवांना लवकरात लवकर गळ्यांचा लिलाव करा अश्या सूचना दिल्या आहेत यावर ए पी एम सी अधिकारी कोणती कारवाई करतात हे पहावे लागेल.निवेदन देणाऱ्यात रमाकांत कोंडूस्कर, संदीप जक्काने,मेहबूब कलमनी आदी उपस्थित होते.