सुळगा हिंडलगा येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून पाणी चोरल्या प्रकरणी संबंधित मालक पाटील यांना गावचा दंड भरण्याच्या निर्णय घेण्यात आलेल्या बैठकीत झाला. यामुळे पाणी चोरी प्रकरण चांगलेच भोवले असून या बैठकीत वादावादीचे प्रसंग घडला होता. काही ग्रामपंचायत सदस्य पाणी चोरावर धावून जाण्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच मोठे घडल्याचे दिसून आले.
मागील काही दिवसांपासून सुळगा येथे पाणी चोरी प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हे प्रकरण तडीस लावण्यासाठी बैठक घेण्यात आली. मात्र सदर बैठकीत अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. त्यामुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र ज्याने पाणी चोरले आहे त्यांनी संपूर्ण गावचे पाणीपट्टीचा कर भरावा असा दंड लावण्यात आला आहे.
हा निर्णय बैठकीत ग्रामपंचायत सदस्य पाणीपुरवठा कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत चर्चा करून घेण्यात आला. त्यानुसार घर मालक अरुण पाटील यांनी संपूर्ण गावची चार महिन्याची पाणीपट्टी भरण्याचे लिहून दिले. पाणीपट्टी भरलेले रितसर पावत्या ग्रामस्थांना देण्यात यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पाटील यांनी घर बांधकाम काढले आहे. घर बांधकामासाठी त्यांनी रीतसर परवाना घेतला होता. मात्र मुख्य पाण्याच्या टाकीतून दोन इंची पाईप जोडून आपल्या घरासाठी पाणी घेतले होते. काही ग्रामपंचायत सदस्यांच्या वरद हस्ता वर त्यांनी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले.पाणी टंचाईत पाणी चोरी झाल्याची बातमी बेळगाव live ने सर्वप्रथम दिली होती.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सदर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पाटील यांना संपूर्ण गावाची पाणीपट्टी भरण्याचा दंड लावण्यात आला.