बेळगाव जवळील भूतरामहट्टी येथील राज्यातील दुसरे मोठे प्राणी संग्रहालय सेवेत येईल अशी माहिती वन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.
रविवारी क्लब रोड मधील फलोत्पादन खात्याच्या वतीने आयोजित होम पार्क मध्ये रोपट्यांच्या बाजाराचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते.
जारकीहोळी पुढे म्हणाले की भूतरामहट्टी प्राणी संग्रहालयात 13 प्रकारचे जंगली प्राणी येणार आहेत मार्कंडेय नदीतून या प्राणी संग्रहालयासाठी तलावाला पाणी देण्याची योजना आहे 2 वाघांसह इतर प्राण्यांना ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा तयार केली जात आहे.
लवकरच पाऊस येईल
हिडकल जलाशयात अजून एक महिना पुरेल इतका पाणी साठा आहे आज मान्सून केरळ मध्ये दाखल झाला आहे आगामी दोन दिवसात तो बेळगावला येईल असे सांगत त्यांनी पाऊस होईल असा विश्वास व्यक्त केला.बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
झाडे विक्री केंद्राचे उदघाटन
बेळगावं उत्तर आमदार अनिल बेनके आणि सतीश जारकीहोळी यांनी रोपट्यांच्या विक्रीचे उदघाटन केले.घराच्या आवारात किंवा शेतात लावण्यासाठी फलोत्पादन खात्याच्या वतीने पुढील 20 दिवसात विविध नमुन्याच्या झाडांची विक्री केली जाणार आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या 28 फलोत्पादन विभागात आगामी 20 दिवसात 3 लाख 73 हजार झाडांची विक्री करू असा विश्वास फलोत्पादन खात्याचे उपसंचालक रवींद्र तराटे यांनी दिली. सी बी टी फॉरेस्ट ऑफिस आर पी डी कॉर्नर आदी ठिकाणी या झाडांची विक्री केली जाणार आहे.चिकू आंबे मिरच्या सह विविध नमुन्यांची झाडे विकली जाणार आहेत.