पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण प्रेमींनी बेळगाव चोर्ला मार्गाच्या दुतर्फा टाकण्यात आलेला कचरा गोळा करून स्वच्छता केली.बेळगावचे वाईल्ड लाईफ वार्डन सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि वन खात्याच्या सहकार्याने जीआयटीच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांनी जंबोटी जवळील पाच किमी रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेला कचरा गोळा करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
बेळगाव चोर्ला रस्ता चांगला आणि जवळ असल्यामुळे या मार्गावर वाहतूक वाढली आहे.या मार्गावरून जाणारे लोक वाटेत वाहने थांबवून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात.पण निसर्ग सौंदर्य न्याहाळत असताना थांबलेल्या ठिकाणी कचरा टाकून जातात.काही जण चालत्या वाहनातून कचरा टाकून वेगाने निघून जातात.
रस्त्याच्या दुतर्फा टाकत असलेल्या कचऱ्यामुळे पर्यावरणाला हानी पोचते आणि त्याचा धोका वन्यजीवांना होतो हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे.बेळगाव चोर्ला मार्गावर घनदाट जंगल असून येथूनच पश्चिम घाट सुरू होतो.पश्चिम घाट आणि चोर्ला मार्ग परिसरात वन्य जीवांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो.रस्त्यात टाकत असलेल्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची हानी होते असा संदेश देणारे फलक देखील बेळगाव गोवा मार्गावर लावून जनतेत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.खानापूरचे आर एफ ओ बसवराज वळद आणि कणकुंबीच्या आर एफ ओ कविता इम्मट्टी यांचे सहकार्य देखील लाभले असे पर्यावरणप्रेमी अमृत चरंतीमठ यांनी सांगितले.
पर्यावरणाचे रक्षण करणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.जंगलाची आर्त हाक आपण संवेदनशील बनून ऐकून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावला पाहिजे. रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेला कचरा विद्यार्थी गोळा करत असताना रस्त्यावरून येणारे जाणारे बघत होते.बेळगाव चोर्ला मार्गावरील कचरा एका दिवसात स्वच्छ करणे कठीण आहे.शंभरहून अधिक स्वयंसेवकांची या कामासाठी आवश्यकता आहे असे वाईल्ड लाईफ वार्डन सचिन पाटील म्हणाले.
दोन दिवसां पूर्वीच बेळगावं live ने ‘रस्त्या शेजारी तळीरामांच्या बाटल्यांचा खच’या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती रस्त्या दोन्ही बाजूचा कचरा काढत यांनी बेळगावातील लोकांना स्वच्छतेचा आगळा वेगळा संदेश दिला आहे.
दोन दिवसां पूर्वीच बेळगावं live ने ‘रस्त्या शेजारी तळीरामांच्या बाटल्यांचा खच’ही बातमी वाचा खालील लिंक मध्ये