हलगा येथील अलारवाड क्रॉस जवळ 19 एकर 20 गुंठे जमीन संपादन करून सांडपाणी प्रकल्प (stp)राबवण्यात येत आहे यासाठी शासनाने जमीन कब्जा घेऊन काम सुरू केले आहे.
सुरुवाती पासूनच शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जमिनी कब्जा घेऊन कामाला सुरुवात केली होती त्या नंतर शेतकऱ्यांनी ग्रामीण आमदारांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत शुक्रवारी काम बंद केलं होतं त्या नंतर प्रशासनाने पुन्हा शनिवारी जमिनीत 144 कलम जारी करून पोलीस बंदोबस्तात काम सुरू केलं आहे.रिंग रोड हलगा मच्छे बायपास रोड नंतर एस टी पी प्लांट जमीन संपादनाला विरोध सुरू आहे.
या सांडपाणी प्रकल्पाच्या जमीन संपादनावरून पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची वक्तव्ये आली आहेत.एकीकडे आमदार शेतकऱ्यांच्या जमिनीला अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्या शेतकऱ्यांची सहानुभूती घेऊ पहात आहेत तर दुसरीकडे पालकमंत्री सतीश जारकीहोळी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी देखील शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी बेळगावात कोणतेही डी सी आल्यास सांडपाणी प्रकल्प होणारच मात्र प्रति एकर 30 लाखाहून अधिक नुकसानभरपाई देऊ असे सांगत कोणत्याही स्थितीत सांडपाणी प्रकल्पाची जागा बदलणार नाही असें स्पष्ट केले.
ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला देणार नाही पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जरा दयाळू पणा दाखवावा असा टोला मारत त्यांनी
शेतकरी सध्या एस टी पी ला जमीन देण्याच्या मनःस्थितीत नाही या योजनेस 19 एकर जमिनीची गरज नाही जे शेतकरी बेरोजगार होणार अश्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्या म्हणाल्या.