हलगा येथील 19 एकर 20 गुंठे सुपीक जमीन सांडपाणी प्रकल्पाला संपादन करण्या वरून शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाले असून शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आंदोलन सुरू ठेवले आहे.
सुवर्ण सौध समोर दोन दिवसांपूर्वी धरणे आंदोलन केल्या नंतर पुन्हा आज हलगा येथील शेतकऱ्यांनी डी सी ऑफिस वर मोर्चा काढत काम बंद करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जात कोणत्या स्थितीत काम बंद करता येणार नाही मात्र नुकसान भरपाई म्हणून वाढीव रक्कम आणि नोकऱ्या देण्यावर चर्चा करू असे आश्वासन दिले.सदर आश्वासन शेतकऱ्यांनी धुडकावून लावत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बोमनहळळी म्हणाले की सध्या नुकसान भरपाई वाढीव देऊ शकतो मात्र काम बंद आंदोलना बाबत पालकमंत्री इतरांशी बैठक करावी लागेल.हलग्याचे शेतकरी इतके आक्रमक झाले आहेत की जिल्हाधिकारी कार्यालया समोर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.सांड पाणी प्रकल्पाचे काम बंद न केल्यास विष प्राशन करू असा इशारा देत महिलांनी हलगा ग्रामस्थ आणि शेतकरी नेत्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.
मोर्चा डी सी ऑफिस समोर येते वेळी शेतकरी नेत्यांत पोलिसात खंडाजगी उडाली होती जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील,वकील सुधीर चव्हाण,शेतकरी नेत्या जयश्री गुरांनावर, प्रकाश नाईक आदी शेतकरी नेत्यांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला आहे.