बेळगाव विमान तळावरून सर्वात गरजेची मागणी असणारी बेळगाव मुंबई विमान सेवा सुरू होणार आहे.पुन्हा एकदा स्पाईस जेट कंपनीने या बेळगाव मुंबई सेवेसाठी 20 जून पासून बुकिंग सुरू केले आहे.
बेळगाव हुन मुंबईला 2380 रुपयांत ही विमान सेवेसाठी बुकिंग सुरुवात करण्यात आली आहे. सदर विमान सेवा उडान योजनेतून आहे की नियमित फ्लाईट आहे याची माहिती मात्र मिळू शकली नाही.एकूणच बेळगावातुन विमान प्रवास करणाऱ्या साठी बेळगाव मुंबई विमान सेवा ही आनंदाची बातमी आहे.
बेळगावं हुन बंगळुरू हैद्राबाद पुणे अहमदाबाद त्यानंतर आता मुंबई विमान सेवा सुरू झाल्याने उत्तर भारत किंवा देश विदेशातील कोणत्याही शहराला बेळगाव हे जोडले जाणार आहे.गेल्या वर्षी 15 मे 2018 रोजी बेळगाव मुंबई ही विमान सेवा बंद झाली होती उडान योजनेचे निमित्त पुढे करत बेळगावची सर्व पाचही विमानसेवा बेळगावहून हुबळीला शिफ्ट झाली होती त्या नंतर तब्बल 13 महिन्यांनी पुन्हा बेळगाव मुंबई विमान सेवा सुरू होत आहे.
स्पाईस जेटचे SG-2548 हे विमान दुपारी 12:25 वाजता बेळगाव हुन मुंबईला जाणार असून 1 तास 15 मिनिटं वेळेत दुपारी 1:40 वाजता मुंबईला पोचणार आहे . SG-2872 हे विमान दुपारी 2:50 वाजता मुंबईहून बेळगाव कडे निघेल सायंकाळी 4:05 वाजता बेळगावला पोहोचणार आहे.ए टी सी कडून मागच्या सारखाच दुपारच्या सत्रात या विमानाला वेळ मिळाली आहे.
27 मे रोजी बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी प्रदीप सिंह खरोला यांची भेटी घेत बेळगाव मुंबई विमान सेवा 20 जून पासून सुरू होईल असं ट्विट केलं होतं बेळगाव live ने ती बातमी 27 मे रोजी प्रसिद्ध केली होती ती खरी ठरत आहे.त्या जुन्या बातमीचे लिंक खालील प्रमाणे